712 | धुळे | पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचं नुकसान
राज्यातील शेतकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट आल्याचं कळतंय. राज्यात ऐन खरिप पिकांच्या वाढीच्या काळात पावसानं दडी मारली. विहीरी आणि नाल्यांमध्येही पाणी नसल्यानं पाणी टंचाईचं मोठं संकट उभं ठाकलं. अशा वेळी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही शेतकरी करतायत. तर काही शेतकरी पीक कापणी अहवालाची मागणी करतायत.