वाढत्या थंडीत घ्या पिकांची काळजी | 712 | धुळे | एबीपी माझा
राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढतोय. नाशिकच्या निफाडमध्ये तर १ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होतं. यामुळे द्राक्षासारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असते. काही भागात दवबिंदूही गोठतायत. अशा कडाक्याच्या थंडीचा गहू, हरभरा या रब्बी पिकांना फायदा होऊ शकतो. मात्र पारा आणखी घसरला तर त्यांचंही नुकसान होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवलीये. अशा वेळी पिकांचं रक्षण कसं करावं, ते जाणून घेऊया...