712 :धुळे : कृषी विभागाच्या कारवाईत बनावट बियाणे, पीक संजीवके जप्त
Continues below advertisement
सध्या देशभरातील शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु आहे. योग्य वेळेत पेरणी करण्यासाठी शेतकरी घाई करताना दिसत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा बोगस बियाणं आणि कृषी निविष्ठा विकणारे घेतात. धुळे जिल्ह्यात अशाच बोगस कृषी निविष्ठा जप्त करण्यात आल्या. जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि कृषी विभागाने संयुक्तिक कारवाई केली होती. या पथकानं शहरातील नकाणे रोडवर असलेल्या एका गोडाऊनवर छापा टाकला. तेव्हा तब्बल ९ लाखांचे बियाणे, कीडनाशके आणि पीक संजीवकं जप्त करण्यात आली.
Continues below advertisement