बोंडअळी, पीक विमा, कर्जमाफीची 100 टक्के अंमलबजावणी करावी : धनंजय मुंडे | 712 | एबीपी माझा
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्यात 151 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. आता या तालुक्यांमध्ये लवकरात लवकर मदत उपलब्ध करुन देण्यात यावी. तसंच पीक विमा आणि बोंडअळीची नुकसान भरपाईची 100 टक्के अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.