712 नवी दिल्ली : शेतातील पाण्याचा अंदाज एका क्लिकवर, IIT मुंबईमधील विद्यार्थ्यांचं उपकरण

Continues below advertisement
शेती क्षेत्रातही इतर क्षेत्रांप्रमाणे नविन तंत्रज्ञानाची गरज असते. यामध्ये भारतात थोडी उदासिनता बघायला मिळते. मात्र आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी या बाबत एक आदर्श निर्माण केलाय. राज्यात आज बहूतांश गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आलीये. मात्र सुधारीत दुष्काळी निकषांमुळे ते मदतीपासून वंचित राहणार आहेत. यावर या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं हे यंत्र उपाय ठरु शकतं. या यंत्राला सेंन्सट्यूब असं नाव आहे. .याद्वारे जमिनीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज लावता येतो. तसच पाणी, माती, रोगराईबद्दल शेतकऱ्याला अपडेटेड माहितीही दिली जाते. १ ते ५०० एकर शेती क्षेत्रापर्यंत हे उपकरण काम करु शकतं. अवघ्या ३५ हजारांमध्ये या विद्यार्थ्यांनी हे उपकरण तयार केलंय. त्यांच्या या उपकरणाची दखल नुकतीच केंद्र सरकारनंही घेतली. या उपकरणावर सरकारनं सबसिडी दिल्यास शेतकऱ्यांना हे यंत्र १० ते १५ हजारात उपलब्ध होऊ शकतं. शिवाय यात घेण्यात आलेली माहिती सॅटेलाईटद्वारे स्टोअर केली जाते. त्यामुळे अचूक माहिती मिळण्यास मदत मिळते. हे असं बहूपयोगी यंत्र तयार करणाऱ्या तरुणांची मुलाखत आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी घेतलीये...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram