712 शेती जगत: देशातील रब्बी पेरणी क्षेत्रात घट
Continues below advertisement
देशातील रब्बी पेरणीत अद्यापही वाढ झालेली दिसून येत नाही. यंदा आतापर्यंतची देशातील रब्बी पेरणी ६०९ लाख हेक्टरवर झालीये. गेल्या वर्षी हा पेरा ६१५ लाख हेक्टर इतका होता. याबाबतची आकडेवारी नुकतीच केंद्रीय कृषी मंत्रालयानं जाहीर केली. यात गहू आणि तेलबियांचं लागवड क्षेत्रही कमी नोंदवण्यात आलंय. गव्हाचं क्षेत्र यंदा २९५ लाख हेक्टर वर आलंय. तर तेलबियांचं क्षेत्र ७८ लाख हेक्टर इतकं आहे.
Continues below advertisement