712 : दिल्ली : खतांच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ
Continues below advertisement
सरकारी तिजोरी प्रमाणेच शेतकऱ्याच्या अर्थकारणावरही काहीसा भार पडणार असल्याचं दिसून येत आहे. कारण काही आवश्य़क खताच्या दरामध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं खतांच्या दरातही सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम स्फुरद आणि पालाशजन्य खतांवर झाला आहे. सरकारी नियंत्रणामुळे युरीयाच्या दरात कुठलाही बदल झाला नाही. मात्र परिस्थिती अशीच राहीली तर खत उत्पादकांना दिल्या जाणाऱ्य़ा अनुदानात सरकारला वाढ करावी लागेल. या दरवाढीमध्ये डीएपी खताची ५० किलोची बॅग आता १, २९० रुपयांची झालीये. तर म्युरेट ऑफ पोटॅश खताच्या दरात १३ टक्क्यांनी वाढ झाली.
Continues below advertisement