712 नवी दिल्ली: ऊस उत्पादकांसाठी ८ हजार कोटींचं पॅकेज?

Continues below advertisement
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी. केंद्र सरकारकडून ऊस उत्पादकांसाठी ८ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. साखर कारखान्यांवरील थकबाकीचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जातंय. तसच ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉकलाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.  यासाठी अंदाजे १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  बफर स्टॉकला मंजुरी मिळाल्यास उत्पादन आणि मागणी यामधलं अंतर कमी होणार आहे.  त्याबरोबरच साखरेचा दरही निश्चित होण्यास मदत होणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram