712 : 7 जूनपर्यंत संपूर्ण पीक विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश
Continues below advertisement
उत्पादन वाढीसाठी असे निर्णय घेतले जात असताना, गेल्या हंगामात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी मात्र वेळेत होताना दिसत नाही. गेल्या खरीप हंगामातील सगळ्या पीक विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा होणं अपेक्षित होतं. त्यासाठी ७ जून ही शेवटची मुदतही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र अजूनही बहूतांश शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे आले नाहीत. गेल्या वर्षी जवळपास ८१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यातील ४५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार होता. त्यासाठी २हजार २६९ कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं अपेक्षित होतं. आतापर्यंत जवळपास १६०० कोटी रुपयेच जमा झालेत. एकूण ७०० कोटी रुपये देणे अजूनही बाकी आहेत. हे पैसे लवकरात लवकर जमा झाले, तर खरीपाच्या तयारीमध्ये शेतकऱ्याला आर्थिक मदतच मिळू शकते.
Continues below advertisement