712 : कापसाच्या हमीभावात वाढ, मात्र उत्पादनात घट
Continues below advertisement
कापसावरील हमीभावातही वाढ करण्यात आलीये. हमीभावात वाढ झाली असली, तरी कापसाची उत्पादकता मात्र घटल्याचं दिसतंय. भारत हा कापूस उत्पादनात अग्रेसर देश मानला जातो. मात्र प्रति हेक्टरी उत्पादकतेमध्ये तो पाकिस्तान, कझाकिस्तानच्याही मागे आहे. यंदा कापूस उत्पादकतेमध्ये चीन भारता पुढे गेलाय. भारताची प्रति हेक्टरी उत्पादकता ५३३ किलो रुई इतकी आहे. तिथेच चीनची उत्पादकता प्रति हेक्टरी १६७६ किलो रुई इतकी आहे. देशातील कापसाच्या उत्पादकतेवर राज्यातील उत्पादकतेचा मोठा परिणाम होतो. महाराष्ट्र कापूस उत्पादनामध्ये देशात अग्रेसर राज्य आहे. गेल्या वर्षी आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे देशातील उत्पादकता घटल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करतायत.
Continues below advertisement