712 शेती जगत : कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार
Continues below advertisement
यंदाचा खरीप हंगाम कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी कठीण गेला. बोंड अळीच्या संकटामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेलं उत्पादन वाया गेलं. तशीच गत झाली धान उत्पादक शेतकऱ्यांची. धानावर तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे मोठं नुकसान झालं. आता या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आलीये. ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत दिली जाणारेय. कृषी विभागानं केलेल्या पंचनाम्यानुसार ही मदत मिळणारेय. यात कोरडवाहू क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये पर्यंत दिली जाणार असल्याची माहिती मिळतेय.
Continues below advertisement