712 : देशातील कापूस निर्यातीत वाढ होण्याची शक्यता
Continues below advertisement
यंदाच्या हंगामात गेल्या ४ वर्षांमधील सर्वाधिक कापूस निर्यात होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करतायत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निर्यातीत ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ५८ लाख २ हजार कापूस गाठींची निर्यात झाली होती. यंदा आतापर्यंत ६३ लाख गाठींची निर्यात झालीये. हा आकडा ७५ लाख गाठींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.भारतीय कापसाला बांगलादेश, पाकीस्तान, चीनसारख्या देशांमध्ये मोठी मागणी. ही मागणी पाहता यंदा शिल्लक कापसाचा साठाही कमी होण्याची शक्यता तज्ञ वर्तवतायत.यंदा केवळ २० लाख टन कापसाचा साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.
Continues below advertisement