राज्यात 82 लाख शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट | मुंबई | 712 | एबीपी माझा
नुकतंच विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. यंदा राज्यातील ८२ लाख शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडली असल्याचं ते म्हणाले. ही संख्या आणखी वाढण्य़ाची शक्यताही त्यांनी वर्तवली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.