712 : मान्सून अपडेट : पावसाचा अंदाज

Continues below advertisement
आता पाहूया मान्सूनची स्थिती काय आहे....
गेल्या काही दिवसात राज्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झालेला दिसतोय. मान्सूनचा प्रवासही काहीसा मंदावला आहे.

या सॅटेलाईट इमेजमध्ये राज्यातील मान्सूनची स्थिती दिसून येते. मान्सूनचे ढग काहीसे पुर्वेकडे प्रवास करताना दिसतायत. राज्यावरील ढगांचं प्रमाणही कमी झालंय. येत्या २४ तासात कोकण गोव्याच बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

आता पाहूया मान्सूनची विभागवार आकडेवारी....
कोकण विभागात सरासरी ६६०.६ मिमी पाऊस होतो. तिथे ९६२ मिमी म्हणजे सरासरीच्या ४६ टक्के जास्त पाऊस झालाये. मध्य महाराष्ट्रात सरासरी १३९.४ मिमी पाऊस पडतो. तिथे १५५.४ मिमी म्हणजेच ११ टक्के जास्त पाऊस झाला. मराठावाड्यात सरासरी १३७.८ मिमी पाऊस होतो. तिथे १८६.८ मिमी म्हणजेच ३६ टक्के जास्त पाऊस झालाये. तर विदर्भात सरासरी १६०.२ मिमी पाऊस होतो. तिथे १८९.४ मिमी म्हणजेच १८ टक्के जास्त पाऊस झालाये. संपूर्ण राज्यात सरासरी १९५.२ मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा २५१.२ मिमी म्हणजेच सरासरीच्या २९ टक्के जास्त पाऊस झालाये.

या मान्सून अपडेट सोबत सातबाराच्या बातम्यांमध्य़े इथेच थांबतोय. बघत राहा एबीपी माझा...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram