712 : मान्सून अपडेट

Continues below advertisement
राज्यापासून मान्सूनचा पाऊस काहीसा दूर जाताना दिसत आहे. राज्यातील पावसाचा जोरही कमी झाल्याचं दिसतंय. मान्सून आता काहीसा उत्तरेकडे म्हणजे पंजाब, राजस्थान अशा राज्यांकडे प्रवास करतोय. महाराष्ट्रावर मान्सूनचे ढग समांतर पसरलेले बघायला मिळत आहेत. येत्या 24 तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशार हवामान खात्याने दिला आहे.

आता पाहूया मान्सूनची विभागवार आकडेवारी....
कोकण विभागात सरासरी ६२३.२ मिमी पाऊस होतो. तिथे ९१५.४ मिमी म्हणजे सरासरीच्या ४७ टक्के जास्त पाऊस झालाये. मध्य महाराष्ट्रात सरासरी १३१.५ मिमी पाऊस पडतो. तिथे १५१ मिमी म्हणजेच १५ टक्के जास्त पाऊस झाला. मराठावाड्यात सरासरी १३२.५ मिमी पाऊस होतो. तिथे १८३.६ मिमी म्हणजेच ३९ टक्के जास्त पाऊस झालाये. तर विदर्भात सरासरी १५२.३ मिमी पाऊस होतो. तिथे १७०.८ मिमी म्हणजेच १२ टक्के जास्त पाऊस झालाये. संपूर्ण राज्यात सरासरी २३८.४ मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा १८५ मिमी म्हणजेच सरासरीच्या २९ टक्के जास्त पाऊस झालाये.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram