712 : मान्सून अपडेट : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून मान्सून दडी मारुन बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेरणीही रखडली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.