712 : येत्या हंगामातही विक्रमी साखर उत्पादनाचा अंदाज
Continues below advertisement
यंदाच्या गाळप हंगामात साखरेचं विक्रमी उत्पादन झालं. यंदा देशात जवळपास ३ कोटी १० लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे. देशातील साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे जवळपास २० कोटी रुपये देणं आहेत. साखरेचा साठा करण्यासाठी जागाही शिल्लक राहिली नाही. अशी परिस्थिती असतानाही येत्या हंगामात यापेक्षा जास्त साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या हंगामाची थकबाकी असतानाही येत्या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करणार आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशभरात ४८ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी जास्त असल्याचंही म्हटलं जातं आहे.
Continues below advertisement