712 : पुणे : सगुणा वनसंवर्धन तंत्र (एसव्हीटी), वणव्याच्या नियंत्रणासाठी नवं तंत्रज्ञान

Continues below advertisement
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे जंगलांमध्ये वणवा पेटतो. संपूर्ण जंगल, त्यातले प्राणी यात होरपळून निघतात. बऱ्याचदा डोंगरांवरही वणवा पेटल्याच्या घटना घडतात. हा वणवा विझवण्याचे काही खास उपाय नाहीत. मात्र वणवा पेटूच नये म्हणून एक सोपं तंत्र शोधल्याचा दावा राज्यातील कृषी पर्यटनाचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांनी केलाय. एस.वी.टी म्हणजेच सगुणा वनसंवर्धन तंत्रज्ञान असं या तंत्राचं नाव आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या तंत्राची माहिती देण्यासाठी पुण्यात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram