712 : नाशिक : नर्सरीतील सीडिंग मशीन तयार करणारा संशोधक तरुण
रोपवाटीकांमध्ये बियांच्या पेरणीसाठी मजुरांची गरज असते. मात्र अशा वेळीच मजुरांचा तुटवडा निर्माण होतो. यावर उपाय म्हणून काही नर्सरीमध्ये मशीनचा वापर केला जातो. या मशीनही विदेशातून मागवाव्या लागतात. या सगळ्या समस्यांवर नाशिकच्या तरुणाने तोडगा काढला आहे. अंकुश मोगल या तरुणानं रोपवाटीकेतील सिडिंग मशीन तयार केलंय.