712 | राज्यात दुधात दरात पुन्हा घसरण | एबीपी माझा
दुधाला प्रति लिटर 25 रुपये दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरु केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं. मात्र 31 ऑक्टोबरनंतर हे अनुदान बंद झालं आणि दुधसंघांवर मोठा आर्थिक ताण पडला. याचाच परिणाम म्हणून आता पुन्हा दुधाचे दर घसरले आहेत. प्रति लिटर 18 रुपयांचा दर आता दुधाला मिळत आहे. आधीच दुष्काळाचं संकट असताना आता ही दरकपातीमुळे शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.