712 : यंदा आंब्याच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

Continues below advertisement
देशातील आंब्याची निर्यात यंदा वाढण्याची शक्यता आहे. आंब्याच्या निर्यातीमध्ये यंदा 25 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांचं उत्पादन कमी झालं. अवकाळी पाऊस, ओखी वादळ यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं. मात्र फळांची गुणवत्ता चांगली असल्यानं, त्यांना विदेशामध्ये मागणी वाढलीये. त्यानुसार यंदा ७० हजार टन आंब्यांची निर्यात होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी ५५ हजार टन आंब्यांची निर्यात झाली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram