712 : देशातील साखर उत्पादनात 11.69 लाख टनांची वाढ
2017-18 वर्षाचा देशातील आतापर्यंतचा साखर उत्पादनाचा आढावा काल सादर करण्यात आला. हा आढावा 30 नोव्हेंबरपर्यंतचा आहे. यानुसार यंदाचं साखर उत्पादन 39 लाख 51 हजार टन इतकं झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.69 लाख टननी जास्त आहे. गेल्या वर्षी याच काळात 27 लाख 82 हजार टन साखर उत्पादन झालं होतं. राज्यातील 170 साखर कारखान्यांनी सध्या साखर उत्पादन सुरु केलं आहे.