712 : कोल्हापूर : राज्यात 2 कोटी 19 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन
सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरु आहे. देशभरातील साखर कारखान्यांमध्ये साखर उत्पादनाचं काम जोमाने सुरु झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील साखर उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र साडे 8 लाख हेक्टर आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास 2 कोटी 27 लाख मेट्रीक टन ऊस गाळप झालं आहे. त्यापासून अंदाजे 2 कोटी 19 लाख क्विंटल साखर उत्पादन झाल्याचं साखर आयुक्तालयाची आकडेवारी सांगते.