712 : इंदापूर : आंबा महोत्सवात कोकणातील शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना विक्री
Continues below advertisement
राज्य कृषी पणन मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने एकत्रितपणे इंदापूरमध्ये आंबा महोत्सव आयोजित केला होता. शहरातील जून्या बाजार समितीच्या आवारात हा आंबा महोत्सव पार पडला. 18 ते 22 मे असा या महोत्सवाचा कालावधी होता. थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेअंतर्गत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आणि उत्तम प्रतीचा आंबा किफायतशीर दराने मिळाल्याने ग्राहकांनी गर्दी केली. या आंबा महोत्सवात आंब्याचे एकूण सतरा स्टॉल लावण्यात आले होते.
Continues below advertisement