712 : खाद्यतेलाच्या आयातमूल्यात कपात, सर्वाधिक घट कच्च्या सोयाबीनच्या तेलात!

Continues below advertisement
केंद्र सरकारने सर्व खाद्यतेलांच्या आयातमूल्यात कपात केली आहे. यात सर्वाधिक घट कच्च्या सोयाबीन तेलामध्ये करण्यात आली आहे. कच्च्या सोयाबीन तेलाच्या आयातमुल्यात प्रति टन 24 डॉलर्सची घट करण्यात आली आहे. या आधी केंद्र सरकारने 27 एप्रिलला खाद्यतेलांच्या आयतमूल्यात बदल केले होते. जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किंमती आणि विदेशी चलनाच्या मूल्यातील बदलांवर सरकार खाद्यतेलाचं आयातमूल्य ठरवत असते. भारत जगातील सर्वाधिक खाद्यतेलाची आयात करणारा देश आहे. कच्च्या सोयाबीन तेलापाठोपाठ कच्च्या पामतेलात 16 डॉलर्सपर्यंत कपात करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram