712 : रब्बी हंगामातील भुईमुगाच्या पेरणीत वाढ
Continues below advertisement
देशातील रब्बी भुईमुगाच्या पेरणीमध्ये वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी जास्त आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं नुकतीच याबाबतची आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षी या काळात भुईमूगाची पेरणी ४ लाख २७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर झाली होती. यंदा ही पेरणी ४ लाख ५९ हजार २०० हेक्टर वर झालीय. यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील भुईमूग पेऱ्यात वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय.
Continues below advertisement