712 : धुळे : कलिंगडाच्या आंतरपिकातून लाखोचं उत्पन्न, गोपाल केले यांची यशोगाथा
उन्हाळा सुरु झाला कि लाल, रसाळ टरबूजांचा मौसमही सुरु होतो. थंडगार टरबूज खाताना उन्हाचा कडाका क्षणात दूर होतो. याच टरबुजाच्या लागवडीतून धुळे जिल्ह्यातील गोपाल केले यांनी लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे. गोपाल यांनी टरबुजाची आंतरपीक म्हणून लागवड केली. मात्र त्याच्या उत्पन्नातून आता प्रमुख पिकाचाही खर्च निघत आहे.