712 : धुळे : पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नका : कृषी विभाग
पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अन्यथा दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागेल. खरीप पिकांची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे ७५ मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभाग करत आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० टक्केच पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत २८ जूननंतरच पेरणीला सुरुवात करण्याचा सल्ला धुळ्यातील कृषी शास्त्रज्ञ जगदीश काथेपुरी यांनी दिला आहे.