712 : बीटी कापूस बियाणे 60 रुपयांनी स्वस्त
Continues below advertisement
बीटी कापासावर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यानंतर बीटी कापूस बियाणे दर नियंत्रण समितीचे बीटी कापसाच्या बियाण्याचे दर कमी करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार बीटी कापूस बियाणे ६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. येत्या हंगामात बीजी-२ हे बियाणे प्रति पाकिट ७४० रुपयांना मिळेल. तर बीजी -१ हे बियाणे ६३५ रुपयांनी उपलब्ध होणारेय. यामुळे शेतकऱ्यांची जवळपास ३०० कोटींची बचत होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement