712 : बीड : शेडनेटमधील शिमला मिरचीतून लाखोंचा नफा, नाथाराव कराडेंची यशोगाथा
शेती हा जोखमीचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. मात्र तरीही बळीराजा हार मानत नाही. आज अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा आपण बघणार आहोत. बीडमधील नाथाराव कराडे यांनी शेडनेटमध्ये भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. वादळी वाऱ्यानं शेडनेट उद्ध्वस्त झालं, पण नाथाराव कराडे पुन्हा उभे राहिले. शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड त्यांनी केली आणि आता यातूनच त्यांना लाखोंचा नफा मिळणारेय.