भारत आणि चीनमध्ये साखर निर्यातीचा कर | 712 | एबीपी माझा
भारताकडून 20 लाख टन कच्ची साखर खरेदी करण्याचा निर्णय चीन सरकारनं घेतलाय. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांत याबाबत करार करण्यात आलाय. या करारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंधरा लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात चीनला निर्यात होणार असल्याची माहिती आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी होईल आणि बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील. त्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य होणारेय. साखर उद्योगाकडून या कराराचं जोरदार स्वागत केलं जातंय. साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण पन्नास लाख टन साखर निर्यात करायची आहे. यापैकी वीस लाख टन साखरेची खरेदी एकटा चीन करतोय.