712 चंद्रपूर: धान वाणांचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचं निधन

Continues below advertisement
देशातील तांदळाच्या 9 जातींच्या संशोधनासाठी आपलं आयुष्य खर्ची करणारे दादाजी खोब्रागडे यांची रविवारी चंद्रपुरात प्राणज्योत मालवली....
पक्षाघात या दीर्घ आजारानं खोब्रागडे ग्रस्त होते. त्यांच्यावर चंद्रपुरातीलच खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. खोब्रागडेंवर उपचारासाठी कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणीही केली होती, मात्र राज्य सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर त्यांना सरकारनं मदत देऊ केली. मात्र ही मदत वेळीच मिळाली असती तर कदाचित खोब्रागडेंचे प्राण वाचले असते...आज दुपारी चंद्रपुरातील नांदेड या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणारेत.
दादाजी खोब्राग़डे यांनी एचएमटी या तांदळाच्या जातीचा शोध लावला होता...धानाची विविध वाणे विकसित करून त्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध केलं होतं. त्यांच्या या अमूल्य कामगिरीसाठी एबीपी माझानं देखील शेती सन्मान या कार्यक्रमात खोब्रागडेंचा गौरव केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram