712 बुलडाणा: नॅशनल सिड्स कंपनीने प्रमाणित केलेले बियाणे बोगस
Continues below advertisement
खरीप हंगामाची सुरुवात झाली की बोगस बियाणं विक्रेत्यांची टोळी राज्यात सक्रीय होते. अशा टोळ्यांपासून फसवणूक टाळण्यासाठी, कृषी विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. पण बुलडाण्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेलं बियाणं बोगस निघालंय. जिल्ह्यात जवळपास २०० एकरावरील सोयाबीनचं बियाणं बोगस असल्याचं समोरं आलंय. पेरणी करुन १० ते १२ दिवस होऊनही उगवण झाली नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषी विभागात तक्रार केली. त्यांच्या पाहणीमध्ये हे समोर आलं. नॅशनल सीड्स कंपनीनेही हे बियाणं प्रमाणित केलं होतं. ७१ टक्के उगवण क्षमता असलेलं बियाणं बोगस निघाल्यानं, कृषी विभाग संभ्रमात आहे.
Continues below advertisement