712 बीटी बियाण्यांची डीएनए चाचाणी सक्तीची
Continues below advertisement
बीटी कापूस बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत. खरीप हंगामात कापसावर आलेल्या बोंड अळीच्या संकटामुळे हा मुद्दा निर्माण झाला. याबाबत बीटी कंपन्यांवर कारवाईही करण्यात आली. आता बीटी बियाण्यांची डीएनए चाचाणी करण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. बियाणे कंपन्यांची बनवेगीरी सुद्धा यामधून समोर येणारेय. तसंच बियाण्यांच्या बाह्यगुणधर्मांची चाचणीही करण्यात येणारेय.राज्यात यंदा बीटी बियाण्याच्या ३० कंपन्यांकडून १०० पेक्षा जास्त वाणांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.
Continues below advertisement