712 | बोंडअळीच्या नुकसान भरपाईला स्थगिती
राज्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश कृषी विभागाने बियाणे कंपन्यांना दिले. मात्र या निर्णया विरोधात बियाणे कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने ही नुकसान भरपाई देण्यास आता स्थगिती दिलीये. जवळपास १ हजार १४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणारेय. मात्र ही भरपाई एकट्या बियाणे कंपन्यांना द्यावी लागणार का, हे उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.