712 | नवी दिल्ली | यंदाच्या हंगामात तेलबियांसाठी भावांतर योजना लागू करणार
गेल्या हंगामात मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी भावांतर योजना राबवली. आता केंद्र सरकारही ही योजना राबवण्याच्या विचारात आहे. तेलबिया पिकांसाठी ही योजना राबवली जाईल. यासाठी १० हजार कोटींच्या तरतुदीचा प्रस्तावही सरकारनं केलाय. भावांतर योजनेमध्ये हमीभाव आणि बाजारभावातील अंतर शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळतील. भावांतर योजना राबवण्यामागे देशातील तेलबियांचे उत्पादन वाढवण्याचाही सरकारचा हेतू आहे. या योजनेमुळे राज्यात सोयाबीन उत्पादकांना फायदा होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे.