712 बीड: काकडी आणि पपई लागवडीतून लाखोंचा नफा
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर वर्षी पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतं. मात्र काही शेतकरी या समस्येवरही मात करत प्रगती साधतात. आज अशाच एका शेतकऱ्याला आपण भेटणार. उदंड वडगावमधील अर्जुन डोळस यांनी शेततळं तयार करत पाण्याची समस्या सोडवली. आणि योग्य नियोजन करत ३० गुंठ्यातील पपई आणि काकडीतून लाखोंचा नफा कमावला.