हंगामाच्या सुरुवातीला अनेक आशा घेऊन बरसलेला पाऊस आता दडी मारुन बसलाय. मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये यामुळे ५० टक्केही पेरणी झाली नाही. आणि ज्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय.