712 | अकोला | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यशाळेचं आयोजन
अकोल्याच्या डाँ. पंजाबराव देशमुख क्रूषी विद्यापीठात अपारंपारिक ऊर्जेवर एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 'अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी' या विषयावर ही कार्यशाळा होती. या कार्यशाळेला महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे आणि कुलगुरू डॉ. विलास भाले यांची उपस्थिती होती. सोबतच राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. आर बी शर्मा, गुजरातच्या सरदार पटेल अपारंपारीक ऊर्जा संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गौरव मिश्राही यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील संधी आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली.