देशातील कापसाच्या आवकीमध्ये 31 टक्क्यांनी घट | 712 | एबीपी माझा
देशात कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला. जागतिक स्थरावरही कापसाची मागणी वाढली. त्यामुळे भारतीय कापसाला चांगला दर मिळू लागला. मात्र आता ही परिस्थिती बदलत असल्याचं दिसून येतंय. जागतिक बाजारात डॉलरचा दर घसरल्यानं त्याचा परिणाम कापसाच्या व्यापारावर झालाय. गेल्या २१ दिवसात डॉलरचा दर ७४ वरुन ७०रुपयांवर आलाय. त्यातच आतापर्यंत देशातून ६ लाख गाठी कापसाची निर्यात झालीये. आणखी १५ लाख गाठी कापसाचे सौदे करण्यात आलेत. मात्र बाजारातील कापसाची आवक घसरलीये. देशातील कापूस आवक ३१ टक्क्यांनी घटलीये. दुष्काळ आणि बोंडअळीचं कारण यामागे असल्याचं सांगीतलं जातंय.