
712 - सोयाबीनच्या दरात वाढ
Continues below advertisement
वर्षाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर कमी असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त होते. त्यानंतर हा दर ३५०० रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र आता जानेवारी अखेर सोयाबीनच्या दरानं ४ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. हा दर आणखी वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय. जगातील सोयाबीन उत्पादनाची आकडेवारी आणि देशातील सोयाबीन उत्पादनात झालेली घट पाहता हा अंदाज बांधण्यात येतोय. दुसरीकडे सरकी आणि रुईच्या दरामध्ये घसरण झाल्यानं कापसाचे दर ५ हजारांनी घटलेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव यामागचं प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जातंय.
Continues below advertisement