712 - साखर उद्योगाला 8 हजार 500 कोटींचं पॅकेज
Continues below advertisement
साखऱेच्या दरासंबंधीची समस्या दूर करण्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे. मंत्रीमंडळाची या संदर्भात बैठक झाली. यामध्ये साखर उद्योगाला ८,५०० कोटींचं पॅकेज देण्यात आलंय. काय आहे या पॅकेजमध्ये ते पाहूया.. यामध्ये इथेनॉल निर्मितीसाठी सगळ्यात जास्त निधी देण्यात आलाय. ४,५०० कोटी रुपये इथेनॉलच्या निर्मितीसाठी देण्यात आलेत. तसच इथेनॉल प्रकल्पांच्या सुधरणांसाठी १३०० कोटी रुपये देण्यात आलेत. साखरेचा बफर स्टॉक करण्यासाठी १२०० कोटी रुपये देण्यात आलेत. तर १५४० कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट खात्यांमध्ये देण्यात येणारेत. सोबतच साखरेच्या विक्रीचा किमान दर २९ रुपये प्रति किलो ठरवण्यात आलाय.
Continues below advertisement