712 : देशभरात 80 टक्के रब्बीची पेरणी पूर्ण
Continues below advertisement
केंद्रीय कृषी मंत्रालयानं नुकतीच यंदाच्या रब्बी पेरणीची आकडेवारी जाहीर केली. यंदा आतापर्यंत देशभरात 80 टक्के रब्बी पेरणी पूर्ण झाली. 565 लाख हेक्टरवरील लागवड करण्यात आली आहे. यात गहू आणि तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झालेली दिसून येत आहे. देशात गव्हाची 301 लाख 74 हजार हेक्टरवर लागवड होते. यात यंदा चार ते पाच टक्क्यांनी घट झाली. अद्याप ही लागवड 14 लाख 20 हजार हेक्टरनी कमी आहे. तसच तेलबियांच्या पेरणीतही चार लाख हेक्टरची कमतरता दिसून येत आहे. यात कडधान्य आणि भाताचा पेरा मात्र वाढला आहे. यंदा भाताची लागवड 18 लाख 77 हजार हेक्टरवर झाली. तर कडधान्याची लागवड 154 लाख 91 हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली.
Continues below advertisement