712: नॉन बीटी बियाण्याच्या 120 ग्रॅमच्या पाकिटावर बंदी
जागतीक बाजारात भारतीय कापसाची मागणी पाहता यंदाच्या हंगामात कपाशीचं दर्जेदार उत्पादन घेणं गरजेचं आहे. बोंडअळीचं संकट पुन्हा येऊ नये यासाठी कृषी विभाग आणि केंद्र सरकार प्रयत्न करतायत. त्यातच केंद्र सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयाला मान्यता दिलीये. बीटी कापसाच्या बियाण्याच्या पाकिटात नॉन बीटी बियाणे मिसळले जाणारेत. याआधी नॉन बीटी बियाण्याचं १२० ग्रॅमचं वेगळं पाकिट दिलं जायचं. नॉन बीटी बियाणं पेरल्यानं बोंडअळीसारख्या किडी या रोपांकडे आकर्षीत होतात. यामुळे प्रादुर्भावाची तिव्रता कळते. मात्र शिफारस करुनही शेतकरी ते बियाणं पेरत नव्हते. तेव्हा यावर हा उपाय योजण्यात आला. या पद्धतीला आरआयबी असे म्हटलं जातं. पुढील हंगामापासून अशा नॉन बीटी मिश्रीत बियाण्यांची विक्री करण्यात येईल.