712 : गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील रब्बी पेरणी सहा लाख हेक्टरने कमी
Continues below advertisement
ओखीच्या प्रभाव झेलत रबीचा हंगाम सुरु आहे. पण गेल्या वर्षीपेक्षा 6 लाख हेक्टरने रब्बीतील पेरणी कमी झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत साडे चार कोटी हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. शुक्रवार अखेर ही लागवड 4 कोटी 42 लाख हेक्टरवर पोहोचली होती. भात आणि कडधान्यांच्या लागवड क्षेत्रात थोडी वाढ झाली. तर गहू आणि तेलबियांचं क्षेत्र कमी झाल्याचं दिसून येतंय. यंदा लांबलेल्या पावसामुळे रबी उत्पादनात वाढ होण्य़ाचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
Continues below advertisement