28 एप्रिल ते 1 मेपर्यंत सलग सुट्ट्या, एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
Continues below advertisement
या आठवड्यात तुमची काही बँकांची कामं राहिली असतील तर ती अत्ताच पूर्ण करा. कारण २८ एप्रिल ते १ मेपर्यंत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असणार आहे. २८ एप्रिलला चौथा शनिवार त्यानंतर २९ला रविवार, सोमवारी बुद्ध पौर्णिमा असल्यानं बँकांना सुट्टी असणार आहे, तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बँका बंद राहतील. गेल्या आठवड्यातच देशभरात चलनाच्या तुटवड्यामुळे एटीएममध्ये पैसे उपलब्ध नव्हते, त्यात आता बँकांना पुन्हा सुट्ट्या आल्यानं ऐटीएममध्ये पैशांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement