Alimony | घटस्फोटानंतर पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय | ABP Majha
Continues below advertisement
पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क आहे, असा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिलाय. घटस्फोटासंबंधी एका प्रकरणात निकाल देताना दिल्ली हायकोर्टानं हे म्हटलं आहे. सीआयएसएफमध्ये कार्यरत निरीक्षकाचं 7 मे 2006 रोजी परिचयातील एका तरुणीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर पाच महिन्यांतच त्यांचा काडीमोड झाला. याप्रकरणी सुनावणी वेळी कनिष्ठ कोर्टाने पतीने पोटगी म्हणून पगाराची 30 टक्के रक्कम देण्याचे निर्देश दिले. पतीने त्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर कनिष्ठ कोर्टाने पोटगीची रक्कम 30 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत कमी केली.
Continues below advertisement