VIDEO | अक्षय्य तृतीयेनिमित्त उद्यान बाप्पाला 2100 आंब्यांची आरास | मुंबई | एबीपी माझा
मुंबईतल्या दादर येथील उद्यान गणेशालाही आज एकविसशे आंब्यांची आरास करण्यात आली. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान आणि देसाई बंधू यांच्यातर्फे श्रींच्या चरणी आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. उद्यान गणेशातला हा नैवेद्य बालिकाश्रम, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात वाटला जाणार आहे.