VIDEO | 2019 ची निवडणूक भाजपसह देशातील गरीबांसाठी महत्वाची- अमित शाह | नवी दिल्ली | एबीपी माझा

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजप अध्यक्ष अमित शाहांना पानीपतची लढाई आठवली.  2019 ची लढाई ही पानीपतच्या लढाई इतकी महत्त्वाची असल्याचं शाह यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. पानीपतच्या लढाईत मराठे हरले आणि भारत अनेक वर्ष पारतंत्र्यात गेला. त्याचप्रमाणे 2019 ची लढाई जिंकण्याची गरज असल्याचं अमित शाह म्हणाले. त्यामुळे गाफिल न राहता 2019 ची लढाई जिंकण्यासाठी कंबर कसा असे आदेश शाहांनी कार्यकर्त्यांना केले. याशिवाय शाह यांनी गांधी कुटुंबियांवर सडकून टीका केली. तसंच मोदीविरोधात एकवटलेल्या विरोधकांवर निशाणा साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola