मुंबई : महाराष्ट्र दिनी पानी फाऊंडेशनचं राज्यात महाश्रमदानाचं आयोजन

Continues below advertisement
उद्या १ मे, महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यभरात महाश्रमदान करण्यात येणार आहे. याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्याच्या महाश्रमदानात राजकीय नेते, मराठी चित्रपटसृष्टी तसंच बॉलिवूडमधले कलाकार सहभागी होतील. उद्योगजगतातील मोठी मंडळीही श्रमदानासाठी हातभार लावणार आहेत . श्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन अभिनेता आमीर खान यानं केलं आहे. सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ४ ते ७ अश्या दोन भागांत महाश्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी श्रमदानाच्या साहित्यांचे १३००० सेट तयार ठेवण्यात आले आहेत. कुदळ, फावडे आणि ३ टोपल्यांचा मिळून एक सेट तयार करण्यात आला आहे.
तर इतिहासात पहिल्यांदाच या श्रमदानासाठी शहरांमधून 1 लाखाहून अधिक लोक गाव खेड्यांकडे श्रमदानासाठी जाणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram